जलाशयाच्या काठांवर पावसाळ्यात पक्षिदर्शन; निसर्गप्रेमींनसाठी पर्वणी

हिरवागार जंगलात हे दुर्मीळ पक्षी पावसाळ्याच्या चार महिन्यांत पक्षिनिरीक्षकांना आता रोज नजरेस पडतील.
जलाशयाच्या काठांवर पावसाळ्यात पक्षिदर्शन;
 निसर्गप्रेमींनसाठी पर्वणी

महाराष्ट्रातील ताडोबा, नागझिरा, फणसाड, पेंच या अभयारण्यांना पाठोपाठ तानसा अभयारण्य पक्षिनिरीक्षक आणि निसर्गप्रेमींच्या पसंतीस उतरले आहे. पावसाळ्याच्या मोसमात तानसा अभयारण्य व भातसा, वैतरणा, मोडकसागर, जलाशय परिसरात मुक्कामी असलेले देशी व विदेशी पक्ष्यांचे थवे विशेष लक्ष वेधत आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्याच्या ३२० चौरस किलोमीटर आभयाण्याच्या क्षेत्रात एकूण २१२ पक्ष्यांच्या विविध प्रजाती आहेत. त्यातील ५५ पक्षी तानसा तलावाच्या आसऱ्यावर राहत आहेत. यात झाडावर वास्तव्य करणारे १२६ पक्षी आहेत, असे तानसा वन्यजीव विभागातून सांगण्यात येत आहे.

तानसा अभयारण्य आणि भातसा, मोडकसागर, मध्य वैतरणा तलाव आणि आजूबाजूला असलेल्या घनदाटहिरवागार जंगलात हे दुर्मीळ पक्षी पावसाळ्याच्या चार महिन्यांत पक्षिनिरीक्षकांना आता रोज नजरेस पडतील. भातसा, मोडकसागर, मध्य वैतरणा व माहुलीगडाच्या घनदाट जंगलात वेगवेगळ्या रंगाचे पक्षी खास पावसाळ्याच्या व हिवाळ्याच्या मोसमात पक्षिनिरीक्षक तसेच निसर्गप्रेमींना साद घालत असतात. पावसाळ्यात पूर्व आफ्रिका देशातून भारतात येणारा स्थलांतरित पक्षी चातक येथे पावसाळ्यात आढळतो. सध्या पक्षी तानसा अभयारण्यात येणाऱ्या निसर्गप्रेमी पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in