फडणवीस, बावनकुळेंसह भाजप २५ जूनला पाळणार 'काळा दिवस'; विरोधकांच्या संविधानाच्या मुद्द्याला देणार उत्तर

विरोधकांनी संविधानाचा मुद्दा उचलल्यानंतर भाजपकडून "काळा दिवस'च्या माध्यमातून उत्तर देण्यात येत आहे.
फडणवीस, बावनकुळेंसह भाजप २५ जूनला पाळणार 'काळा दिवस'; विरोधकांच्या संविधानाच्या मुद्द्याला देणार उत्तर

२५ जूनला भाजप राज्यभरात 'आणीबाणी-एक काळा दिवस' पाळणार आहे. भाजप राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमाचं आयोजन करणार आहे. विरोधकांनी संविधानाचा मुद्दा उचलल्यानंतर भाजपकडून "काळा दिवस'च्या माध्यमातून उत्तर देण्यात येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी काळा दिवस पाळणार आहेत.

भारतात २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ या २१ महिन्यांच्या कालावधीत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. यादरम्यान, लाखो लोकांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. आणीबाणी काळात माध्यमांवरही बंदी घालण्यात आली होती. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना २५ जून १९७५ साली घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीचा निर्णय लोकशाहीचा गळा घोटणारा होता, अशी टीका सातत्यानं भाजपकडून केली जाते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीपूर्वी भाजप सुमारे ४०० जागा जिंकेल, असं अनेक राजकीय सर्व्हेंच्या माध्यमातून समोर आलं होतं. परंतु निवडणूकीच्या निकालानंतर हे सर्व सर्व्हे चुकीचे ठरले आणि भाजपला २४३ जागा मिळाल्या. दरम्यान काँग्रेसनं ९९ जागा मिळवल्या तर काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीनं सुमारे २३५ जागा मिळवल्या. निवडणूकीच्या अपयशाची कारण सांगितला, भाजप संविधान संपवणार, असा विरोधी पक्षांनी खोटा प्रचार केला, त्यामुळं भाजपला फटका बसला असं भाजपकडून सांगण्यात आलं. आता २५ जून रोजी 'काळा दिवस' पाळून विरोधकांना एकप्रकारे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in