विधान परिषद निवडणूक : भाजपतर्फे विधान परिषदेसाठी जठार, कोल्हेंना उमेदवारी

येत्या १२ मे रोजी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी रात्री उशीरा पाच उमेदवारांची यादी जाहीर केली.
विधान परिषद निवडणूक : भाजपतर्फे विधान परिषदेसाठी जठार, कोल्हेंना उमेदवारी
विधान परिषद निवडणूक : भाजपतर्फे विधान परिषदेसाठी जठार, कोल्हेंना उमेदवारी
Published on

मुंबई : येत्या १२ मे रोजी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी रात्री उशीरा पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीतून भाजपने अपेक्षेप्रमाणे संघटनेतील जुन्या कार्यकर्त्यांना विधान परिषदेवर जाण्याची संधी दिली आहे. उमेदवारांमध्ये अहिल्यानगर  जिल्ह्यातील सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे या दोघांचा समावेश आहे. विधान परिषदेसाठी पाच उमेदवार देऊन भाजपने निवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत दिले आहेत.

विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत ३० एप्रिल अशी आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आज ९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली. तर विधान परिषदेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपने अपेक्षेनुसार प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे.

विधान परिषद निवडणूक : भाजपतर्फे विधान परिषदेसाठी जठार, कोल्हेंना उमेदवारी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान

विधान परिषदेची उमेदवारी मिळालेले सुनील कर्जतकर हे पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत. पक्ष संघटनेत त्यांनी महत्वाची पदे भूषवली आहेत. तर विवेक कोल्हे हे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आहेत. भाजपने पक्षाच्या सरचिटणीस माधवी नाईक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी आमदार प्रमोद जठार यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. उमेदवारांच्या यादीत संजय भेंडे यांच्याही नावाचा समावेश आहे.

प्रज्ञा सातव यांना उमेदवारी

विधान परिषदेत काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रज्ञा सातव यांनी डिसेंबर २०२५ मध्ये तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये    प्रवेश केला होता. भाजपने    या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी कायम ठेवली आहे. ही पोटनिवडणूक सुद्धा बिनविरोध पार पाडणार आहे. पोटनिवडणुकीच्या जागेचा कार्यकाळ जुलै २०३० पर्यंत आहे.

logo
marathi.freepressjournal.in