मीरा-भाईंदरमधील टिपू सुलतान चौकाचे नाव अखेर बदलणार; भाजपचा महासभेत प्रस्ताव

मीरा-भाईंदर महानगरपालिका मध्ये सत्ताधारी भाजपाने धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी तसेच वातावरण खराब होऊन वाद चिघळण्यासाठी हजरत टिपू सुलतान चौकाचे नाव बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या १८ फेब्रुवारी रोजीच्या महासभेत चालवला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
मीरा-भाईंदरमधील टिपू सुलतान चौकाचे नाव अखेर बदलणार; भाजपचा महासभेत प्रस्ताव
Published on

भाईंंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका मध्ये सत्ताधारी भाजपाने धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी तसेच वातावरण खराब होऊन वाद चिघळण्यासाठी हजरत टिपू सुलतान चौकाचे नाव बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या १८ फेब्रुवारी रोजीच्या महासभेत चालवला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. २०१६ सालच्या महासभेत हजरत टिपू सुलतान चौकाचे नाव भाजपनेच दिले असून आमदार नरेंद्र मेहता यांनी ठराव मांडला व त्याला भाजपच्या वर्षा भानुशाली यांनी अनुमान दिल्याचा ठरावच काँग्रेसने सादर केला आहे . त्यामुळे भाजपची चांगलीच अडचण झाली आहे.

मीरा-भाईंदरमधील टिपू सुलतान चौकाचे नाव अखेर बदलणार; भाजपचा महासभेत प्रस्ताव
'टिपू सुलतान'वरून वादाचा धुरळा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून माफीची मागणी

मीरा - भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेने ३ डिसेंबर २०१६ रोजी ठराव क्रमांक ९७ अन्वये मिरा रोड पूर्वेच्या लोधा कॉम्प्लेक्स रोड येथील चौकाला भाजपाने हजरत टिपू सुलतान चौक असे नाव दिले आहे तर सदरवेळी सूचक म्हणून त्यावेळेसचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता हे होते तर अनुमोदक म्हणून भाजपच्या नगरसेविका वर्षा भानुषाली होत्या त्यावेळी सदरील ठराव हा बहुमताने पारित करून महापुरुषांची नावे देण्यात आली होती.

तसेच त्यानंतर मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेनेच २३ जून २०२१ रोजी ठराव क्रमांक २३ अन्वये मीरा-भाईंदर शहरातील विविध रस्ते चौक सार्वजनिक जागा महापालिकेच्या इमारती पालिकेने विकसित केलेले आरक्षणे याचे नामकरण करणे करिता धोरण निश्चित करेच यापूर्वी दिलेल्या महापालिकेच्या वास्तू व चौक रस्ते यांना दिलेल्या नावात बदल करण्यात येऊ नये यावेळी ज्या थोर व्यक्ती महापुरुष व शहरातील समाजसेवक यांची नावे दिलेली आहेत, ती नावे पुन्हा बदलू नयेत असा ठराव आताच्या महापौर व तत्कालीन नगरसेविका डिंपल मेहता यांनी सूचक म्हणून दिला होता तर अनुमोदक म्हणून नगरसेवक दिनेश जैन यांनी अनुमोदन केले होते. असे असतानाही भाजपने व महासभेनेच केलेल्या ठरावाच्या विरोधात धार्मिक वाद चिघळण्यासाठी पुन्हा टिपू सुलतान चौकावरून शहरात वाद निर्माण करत आहे. दरम्यान, नाव बदलण्याचा घाट घालून भाजप धार्मिक वाद चिघळवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेसचे गटनेते जय ठाकूर यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in