
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर झाले आहेत. कसबा मतदारसंघातून भाजपकडून हेमंत रासने आणि चिंचवड मतदारसंघासाठी भाजपमधून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचा समावेश आहे. दोन्ही मतदारसंघात इच्छुकांची मोठी यादी होती. भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. त्यावरून अनेक तर्कवितर्क लावले गेले होते.