"बाळासाहेबांबाबत मला नेहमीच श्रद्धा, पण..." विधानावर स्पष्टीकरण देताना काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

बाबरी मशीद पडताना बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनीकांची भूमिका नव्हती, असे विधान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले होते, त्यानंतर यावर स्पष्टीकरणही दिले
"बाळासाहेबांबाबत मला नेहमीच श्रद्धा, पण..." विधानावर स्पष्टीकरण देताना काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

एका जाहीर मुलाखतीमध्ये भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी, 'बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची भूमिका नव्हती,' असे विधान केले. यावरून आता सध्या राज्यात चांगलाच वाद रंगला आहे. त्यांनी केलेल्या या विधानावरून आता ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी भाजपसह शिंदे गटावर टीका केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांनी केलेल्या विधानावर स्पष्टीकरण दिले.

भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरेंबाबत मला नेहमी श्रद्धाच राहिली आहे. त्या मुलाखतीमध्ये मी श्रद्धेने हे सगळे मांडले होते. बाळासाहेब ठाकरेंमुळे अनेक हिंदुत्ववादी मुद्द्यांना चालना मिळाली तर मुंबई जेव्हा दंगली झाल्या तेव्हा मुंबईतला हिंदु जीवंत राहिला. बाबरी मशिदीचे आंदोलन हे १९८३पासून विश्व हिंदु परिषदेच्या नेतृत्वात सुरु झाले होते. यावेळी ढाचा पाडताना सगळेच हिंदू होते. हा शिवसेनेचा, हा भाजपचा असे भेद नव्हते." असे त्यांनी स्पष्टीकरण देताना म्हंटले आहे.

ते पुढे म्हणाले की, "विश्वहिंदु परिषद, बजरंग दलाच्या नेतृत्वामध्ये हे सगळे घडले. पण शिवसेनेचा अयोध्या ढाचा पाडण्याचा संबंध नव्हता, तर तसे नाही आहे. शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांनी अयोध्या मंदिरसाठी सोन्याची वीट पाठवली होती. तर, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी श्रेय घेतलंच होतं. चुकूनही त्यांच्याबद्दल अनादर व्यक्त करण्याचा मुद्दा नाही," असे चंद्रकांत पाटील म्हणाले. पुढे ते म्हणाले की, "मी स्वतः उद्धव ठाकरेंना फोन करून गैरसमज दूर करणार आहे," असेदेखील ते म्हणाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in