देवेंद्र फडणवीस यांना भाजपाने दिली मोठी संधी

पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवराजसिंह चौहान आणि नितीन गडकरी यांना यातून वगळण्यात आले आहे
देवेंद्र फडणवीस यांना भाजपाने दिली मोठी संधी

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षाच्या संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीची नव्याने स्थापना केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवराजसिंह चौहान आणि नितीन गडकरी यांना यातून वगळण्यात आले आहे. जेपी नड्डा हे भाजपच्या संसदीय मंडळाचे आणि निवडणूक समितीचे अध्यक्ष असतील. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निवडणूक समितीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे.

भाजपच्या संसदीय मंडळात काही नवीन नावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, सुधा यादव, इक्बाल सिंग लालपुरा, सर्बानंद सोनेवाल, के लक्ष्मण आणि सत्यनारायण जाटिया यांचा समावेश आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भूपेंद्र यादव आणि ओम माथूर या दोन नव्या चेहऱ्यांना निवडणूक समितीमध्ये संधी देण्यात आली आहे. शाहनवाज हुसेन यांना निवडणूक समितीत स्थान मिळाले नाही. दुसरीकडे, सोनेवाल आणि येडियुरप्पा यांनी दोन्ही ठिकाणी जागा मिळवल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in