साताऱ्यात उदयनराजेंना भाजपची उमेदवारी

साताऱ्यात उदयनराजेंना भाजपची उमेदवारी

सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये आता उदयनराजे भोसले यांची थेट लढत महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याशी होणार आहे.

सातारा : राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातून अखेर छत्रपती उदयनराजे भोसले यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने मंगळवारी काही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातून छत्रपती उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये आता उदयनराजे भोसले यांची थेट लढत महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याशी होणार आहे. या मतदारसंघातील विद्यमान खासदार देखील शरद पवार गटाचे असून त्यांनी यावेळी आरोग्याचे कारण देत निवडणुकीत उभे राहणार नसल्याचे स्पष्ट केल्याने शरद पवार गटाच्यावतीने शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in