उत्तर-मध्य मुंबईत भाजप नव्या चेहऱ्याच्या शोधात; उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा

उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी महत्त्वाचा आहे. या मतदारसंघातून यावेळी पूनम महाजन यांच्याऐवजी नवा चेहरा देण्याची भाजपची योजना आहे. त्यासाठी भाजप अगोदरपासूनच नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे.
उत्तर-मध्य मुंबईत भाजप नव्या चेहऱ्याच्या शोधात; उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा

विशेष प्रतिनिधी/मुंबई

उत्तर-मध्य मुंबईत भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन या विद्यमान खासदार आहेत. मात्र, यावेळी त्यांच्याऐवजी भाजप नव्या उमेदवाराच्या शोधात आहे. त्यासाठी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना मैदानात उतरविण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु शेलार यांनीच लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनाही गळ घालण्यात आली. परंतु त्यांनीही निवडणूक लढण्यास नकार दिला. मात्र, कोणत्याही परिस्थितीत येथे चर्चेतला चेहरा हवा आहे. त्यामुळे भाजपने आता ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा सुरू केली आहे.

उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी महत्त्वाचा आहे. या मतदारसंघातून यावेळी पूनम महाजन यांच्याऐवजी नवा चेहरा देण्याची भाजपची योजना आहे. त्यासाठी भाजप अगोदरपासूनच नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे. यावेळी मुंबईत भाजपचे विद्यमान खासदार असलेल्या तिन्ही मतदारसंघात नवे चेहरे देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या अगोदर उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी पियूष गोयल यांच्या रूपाने नवा चेहरा दिला आहे. तसेच इशान्य मुंबईत मिहीर कोटेचा यांना संधी दिली आहे. आता उत्तर-मध्य मुंबईतही भाजप नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे. मात्र, याबाबत अधिक गुप्तता बाळगण्यात येत आहे. ऐनवेळी नव्या नावाची घोषणा केली जाऊ शकते. परंतु एक प्रसिद्ध, चर्चेतला चेहरा मैदानात उतरविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

या जागेवर सर्वप्रथम भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. सुरुवातीला त्यांचे नाव निश्चित मानले जात होते. परंतु त्यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला. यादरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनाही विचारणा करण्यात आली. परंतु तिनेही निवडणूक लढण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर आता ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, याबाबत फारशी वाच्यता करण्यात येत नाही. ही जागा महत्त्वाची असल्याने भाजप वेगवेगळ्या नावांची चर्चा करत आहे. त्यामुळे ऐनवेळी नवे नावही समोर येऊ शकते. या अगोदर उज्ज्वल निकम यांची जळगावच्या जागेसाठी चर्चा होती. मात्र, ती चर्चा मागे पडली. मात्र, आता उत्तर-मध्य मुंबईसाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

पूनम महाजनांविषयी मतदारसंघात नाराजी

खरे तर यावेळीदेखील या मतदारसंघात पूनम महाजनच दावेदार होत्या. बऱ्याच ठिकाणी भाजपने जोखीम न उचलता विद्यमान खासदारांना उमेदवारी दिली. मात्र, उत्तर-मध्य मुंबईत पूनम महाजन यांच्या उमेदवारीला विरोध होत असल्याचे कारण पुढे करण्यात आले. खरे तर पूनम महाजन एक तरुण चेहरा आहे. परंतु त्यांना उमेदवारी नाकारून भाजपने नव्या चेहऱ्याचा शोध सुरू केला आहे.

मुंबईच्या सर्वच जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य

भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबईवर मजबूत पकड निर्माण करायची आहे. त्यासाठी मुंबईत सर्वच खासदार निवडून आले पाहिजेत, यासाठी महायुतीचा प्रयत्न आहे. त्यामुळे शिंदे गटसोबत असताना मुंबईत काँग्रेस आणि ठाकरे गटाची शिवसेना खिळखिळी केली. आता मुंबईतील सर्वच्या सर्व म्हणजे सहा जागा जिंकण्याचे महायुतीचे लक्ष्य आहे. त्यासाठी महायुती सावध पावले टाकत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in