भाजप नेते चरेगांवकर यांची यशवंत बँकेच्या संचालक पदावरून हकालपट्टी

पुणे येथील महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थाचे अपर निबंधकांकडे तक्रार केली होती
भाजप नेते चरेगांवकर यांची यशवंत बँकेच्या संचालक पदावरून हकालपट्टी
Published on

कराड : राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे सातारा जिल्ह्यातील जेष्ठ नेते शेखर चरेगावकर यांची दि यशवंत को.ऑपरेटिक बँक लि.फलटण, जि.सातारा या बँकेच्या संचालक पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. दि वाई अर्बन को-ऑप. बँकेची तब्बल ५ कोटी ४५ लाख रुपयांची थकबाकी केल्याने पुणे येथील महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थाचे अप्पर निबंधक (प्रशासन) शैलेश कोतमिरे यांनी सदर कारवाई केली आहे.चरेगांवकर हे आदेशाच्या दिनांकापासून संचालक मंडळाच्या पुढील पाच वर्षांच्या मुदतीचा कालावधी समाप्त होईपर्यंत सदस्य म्हणून पुन्हा नेमणूक केली जाण्यास, पुन्हा नामनिर्दिष्ट होण्यास, पुन्हा स्वीकृत होण्यास किंवा पुन्हा निवडून येण्यास पात्र असणार नाहीत, असेही आदेशात म्हटले आहे. याबाबत संजीव दत्तात्रय कुलकर्णी यांनी पुणे येथील महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थाचे अप्पर निबंधकांकडे तक्रार दाखल केली होती.

दि यशवंत को.ऑपरेटिक बँकेची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० आणि त्याखालील महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ या मधील तरतूदीनुसार झालेली आहे. संजीव दत्तात्रय कुलकर्णी हे बँकेचे सभासद असून, त्यांनी १७ जाने रोजी पुणे येथील महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थाचे अपर निबंधकांकडे तक्रार केली होती.

logo
marathi.freepressjournal.in