साई रिसॉर्ट सीआरझेडचे उल्लंघन करून बांधले - सोमय्या

रिसॉर्ट बांधताना त्यांनी समुद्र गिळंकृत केला. २०० मीटरच्या आत बांधकाम करून सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले. हा गंभीर गुन्हा असल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे व न्यायालयात अनधिकृत बांधकाम तोडण्याची हमी दिली आहे
साई रिसॉर्ट सीआरझेडचे उल्लंघन करून बांधले - सोमय्या

रत्नागिरी : दापोली मुरूड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्ट हॉटेल अनिल परब यांनीच बांधले असून, सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून बांधले असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

रिसॉर्ट बांधताना त्यांनी समुद्र गिळंकृत केला. २०० मीटरच्या आत बांधकाम करून सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले. हा गंभीर गुन्हा असल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे व न्यायालयात अनधिकृत बांधकाम तोडण्याची हमी दिली आहे; मात्र हे तोडकाम करण्याची कार्यवाई गतिमान व्हावी या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांचेकडे सोमय्यांनी सोमवारी रत्नागिरीत येऊन धाव घेतली व सदरचे तोडकाम करताना पर्यावरण विषयक मंजुरी घेऊन तोडकाम कार्यवाई केली जावी, अशी कैफियत जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडली व त्यानंतर पत्रकारांनी माहिती देताना सदरचे रिसॉर्ट हे सदानंद कदम यांनी २०२१ मध्ये अनिल परब यांच्याकडून खरेदी केले आहे असे न्यायालयीन प्रक्रियेत समोर आले असून, सीआरझेड कायदा उल्लंघन कारवाई व रीतसर गुन्हे अनिल परब यांच्यावर झालेच पाहिजेच, असे ठणकावून सांगितले.

कोल्हापूरचे अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध उभारलेला लढा संपला काय? यावर प्रतिक्रिया देताना, किरीट सोमय्या यांनी पक्षाने विकासाच्या मुद्द्यावर काही निर्णय घेतले व वरिष्ठ पातळीवर जे निर्णय घेतले जातात त्यावर माझ्यासारखा कार्यकर्ता पक्षाच्या वरिष्ठांच्या निर्णयाच्या पुढे जाणार नाही. सामान्य कार्यकर्ता म्हणून वरिष्ठ पातळीवरचे निर्णय माझ्यासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगून टाकले.

मी कोणतेच आंदोलन थांबवलेले नाही

अलिबाग येथील रश्मी ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यासंदर्भात त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तत्कालीन पदाधिकारी व संबंधितांनी जुने रेकॉर्ड बदलले. भ्रष्टाचाराविरोधात लढा देताना न्यायालयीन प्रक्रियेत गेल्यावर माझी भूमिका बाकी राहत नाही व मी कोणतेच आंदोलन थांबवलेले नाही, असे देखील किरीट सोमय्या म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in