सुप्रिया सुळेंकडून भावनिक राजकारण - प्रवीण दरेकर

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
सुप्रिया सुळेंकडून भावनिक राजकारण - प्रवीण दरेकर

मुंबई : सुनेत्रा वहिनी जर आईसमान असतील, तर सुप्रिया सुळेंनी आईविरोधात निवडणूक लढवू नये. आईला समर्थन दिले पाहिजे. एका बाजूला आई म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूने टीका करायची. सुप्रिया सुळेंचा हा भावनिक राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचे टीकास्त्र भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सोडले आहे. सर्वसामान्य बारामतीकर जनता ही अजितदादांच्याच पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. आपल्या मोठ्या भावाची बायको ही आपल्या आई समान असते. त्यामुळे आमच्या आईला भाजपने लोकसभा निवडणुकीत उतरवावे लागत आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी रविवारी केली. या टीकेला भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

यावेळी प्रवीण दरेकर म्हणाले की, राज्यात फोडाफोडीचे राजकारण करणारा नेता कोण आहे, हे उभ्या महाराष्ट्राला नीट माहीत आहे. ज्यांनी या राज्यांत अनेकांची घरे फोडली, ते घरफोड्याही महाराष्ट्राला माहीत असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी यावेळी केली. अजित पवार यांच्या कर्तृत्वाला आव्हान देता येणार नाही. त्यामुळे कुटुंबीयांच्या गोष्टी करत असतानाच एकट्या अजित पवार यांच्या कुटुंबीयांना पवार कुटुंबीयाने वाऱ्यावर सोडले आहे, याचे वाईट बारामतीच्या जनतेला वाटत असून त्याचे प्रतिबिंब या निवडणुकीत दिसून येणार आहे. बारामतीकर अजित पवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचा दावाही प्रवीण दरेकर यांनी यावेळी केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in