
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे कमळ फुलवण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. राज्यात भाजपची संघटन बांधणीसह गाव खेड्यापर्यत पोहोचत थेट मतदारांशी संवाद साधण्याचा ध्यास भाजपने केला आहे. यासाठी राज्यभरात १,२२१ मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. त्यापैकी ९६३ मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया पद्धतीने पूर्ण झाली आहे. “संघटन हेच खरे बळ” तत्त्वावर चालत भाजपने आता महाराष्ट्रात भक्कम तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे. भाजपच्या संघटनात्मक बांधणीचा हा टप्पा महाराष्ट्राच्या सर्व भागांतील राजकीय ताकद दृढ करण्याच्या दृष्टीने निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. राज्यभर १,२२१ मंडळ गठीत करण्यात आले असून पैकी ९६३ मंडळांची रचना जाहीर करण्यात आली आहे. त्यातील २५८ मंडळे नव्याने स्थापन केली गेली आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ही सुरुवात मानली जाते.
…अशी आहेत मंडळे
कोकण - ठाणे विभाग - १८४ मंडळे
उत्तर महाराष्ट्रात - १८४ मंडळे
पश्चिम महाराष्ट्रात - २२२ मंडळे
विदर्भात - ३१३ मंडळे
मराठवाड्यात - २०७ मंडळे
मुंबई विभागात - १११ मंडळे