दोन बायकांमुळे निवडणूक रद्द होऊ शकत नाही; आमदार राजेंद्र गावित यांना दिलासा

एखाद्या लोकप्रतिनिधीला बहुपत्नीत्वच्या मुद्दयावरून हटविणे योग्य नाही. तो आमदारपदावरून हटविण्याचा आधार होवू शकत नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने...
दोन बायकांमुळे निवडणूक रद्द होऊ शकत नाही; आमदार राजेंद्र गावित यांना दिलासा
Published on

मुंबई : एखाद्या लोकप्रतिनिधीला बहुपत्नीत्वच्या मुद्दयावरून हटविणे योग्य नाही. तो आमदारपदावरून हटविण्याचा आधार होवू शकत नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने शिवसेना आमदार राजेंद्र गावित यांचा विजय रद्दबातल घोषित करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली.

न्या. संदिप मारणे यांच्या एकलपीठाने हा निर्णय देताना आमदार गावित यांनी त्यांच्या वैवाहिक स्थितीबद्दल प्रामाणिक माहिती देणे निवडणूक नियमांचे उल्लंघन करत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सामाजिक कार्यकर्ते आणि पालघरचे मतदार सुधीर जैन यांनी यांनी शिवसेना आमदार राजेंद्र गावित यांना दोन पत्नी असल्याने त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती संदिप मारणे यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

न्यायालय म्हणते…

गावित हे आदिवासी भिल्ल समुदायाचे आहेत. त्यांच्यात बहुपत्नीत्वाला प्रथेनुसार बंदी नाही. त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या दोन्ही पती-पत्नींचे पॅन क्रमांक आणि आयकर रिटर्न स्थितीसह तपशील दिला आहे. समुदायामध्ये बहुपत्नीला परवानगी आहे, त्या समाजातील व्यक्तीला निवडणुकच लढविण्यात येणार नाही. आमदार गावित यांनी त्यांच्या वैवाहिक स्थितीबद्दल त्यांनी प्रामाणिक माहिती देणे निवडणूक नियमांचे उल्लंघन करत नाही.

logo
marathi.freepressjournal.in