भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन, ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांचे शुक्रवारी सकाळी मुंबईत निधन झाले.
भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन, ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रतिनिधी/मुंबई

वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांचे शुक्रवारी सकाळी मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. पाटणी यांना गंभीर आजाराचे निदान झाले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना पाटणी यांनी शुक्रवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सकाळी एक्स या समाजमाध्यमातून पाटणी यांच्या निधनाची माहिती दिली. विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणी यांचे निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली, असे फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, राजेंद्र पाटणी यांच्या निधनामुळे २०१९ मध्ये चौदाव्या विधानसभेत निवडून आलेल्या आणि काळाच्या पडद्याआड गेलेल्या आमदारांची संख्या आता नऊ इतकी झाली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत भालके (पंढरपूर), काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर (देगलूर), चंद्रकांत जाधव (कोल्हापूर उत्तर), शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या रमेश लटके (अंधेरी पूर्व) आणि भाजपच्या लक्ष्मण जगताप (पिंपरी चिंचवड), मुक्ता टिळक (कसबा पेठ), गोवर्धन शर्मा (अकोला पश्चिम) आणि शिवसेनेच्या (खानापूर आटपाडी) यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in