भिवंडीतील पडघ्यामध्ये संत संमेलन आणि हिंदू धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या धर्मसभेमध्ये भाजपआमदार टी. राजा सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. १०० किल्ल्यांवर मशिदी आणि दर्गाह आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तिथे सफाई करावी, असं टी. राजा म्हणाले. ४०० पार नंतर भारत हिंदू राष्ट्र झाला असता, असंही ते म्हणाले. वक्फ बोर्ड कायदा संपवून टाका अशी मागणी त्यांनी केली.
पूर्ण देशातील हिंदू तुमच्यासोबत...
टी. राजा सिंह म्हणाले की, “आपल्याला सरकारचे हात मजबूत करायला हवेत. एकनाथ शिंदे हिंदू राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशातील हिंदू तुमच्यासोबत आहेत. मलंगगडाला मुक्त करा. शिंदेजी, तुम्हाला कुणाचं भय आहे? आमच्या सभांना आडकाठी आणली जातेय, आम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून अडवलं जातंय, FIR टाकल्या जात आहेत. शिंदेजी घाबरू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमच्या आजूबाजूला काही सेक्युलर किडे बसले आहेत. पण त्यांच्याबाबतीत तुम्ही विचार करू नका. जो हिंदूंच्या हितावर बोलेल, तो महाराष्ट्रावर राज्य करेल”
तर हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं...
टी.राजा म्हणाले की, "राजकारणी नेत्यांशिवाय हिंदू राष्ट्र घोषित होऊ शकत नाही. यावेळी निवडणुकीत जर आपण ४०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या असत्या, तर हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं." ते असंही म्हणाले की,