व्हिलचेअरवरुन भाजप खासदार गिरीश बापट पुणे पोटनिवडणुकीच्या प्रचारात

पुण्यात कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या प्रचारामध्ये उतरले खासदार गिरीश बापट
व्हिलचेअरवरुन भाजप खासदार गिरीश बापट पुणे पोटनिवडणुकीच्या प्रचारात
Published on

पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले. यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुकीच्या घोषणा करण्यात आली. यावेळी भाजपने टिळक कुटुंबातील सदस्यांपैकी कोणालाही तिकीट न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. यामुळे भाजपाला फटका बसू शकतो अशी चर्चा असतानाच भाजपकडून पुण्यातील त्यांचे हुकमी एक्के मानले जाणारे खासदार गिरीश बापट यांना प्रचारासाठी मैदानात उतरवले आहे. त्यांनी आज हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.

या मेळाव्यासाठी गिरीश बापटदेखील उपस्थित होते. तब्येत बरी नसतानाही नाकात नळी, सोबत ऑक्सिजन सिलेंडर असतानाही व्हीलचेअरवरून येत त्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली. यानंतर सगळीकडेच चर्चा सुरु झाली. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी आहेत. त्यामुळे ते कसबा पोट निवडणुकीच्या प्रचारात कुठेही सहभागी झाले नाहीत. गेल्या ३ महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु असून ते कसबा पोटनिवडणुकीसाठी हजेरी लावू शकणार नाहीत, असे स्पष्ट केले होते. मात्र, काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली. यानंतर गिरीश बापट यांनी स्वतः प्रचारात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपला याचा कसबा पोटनिवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in