भाजप-सेनेत नाराजीनाट्य कायम; सेना मंत्र्यांना खासगी सचिवांची प्रतीक्षा

राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यापासून महायुतीतील घटक पक्ष भाजप व शिवसेनेतील वाद वेळोवेळी समोर आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारितील विभागात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप, निधी वाटपात दुजाभाव अशा अनेक प्रकरणात शिंदे सेना व भाजपमधील वाद समोर आला आहे.
भाजप-सेनेत नाराजीनाट्य कायम; सेना मंत्र्यांना खासगी सचिवांची प्रतीक्षा
Published on

मुंबई : राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यापासून महायुतीतील घटक पक्ष भाजप व शिवसेनेतील वाद वेळोवेळी समोर आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारितील विभागात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप, निधी वाटपात दुजाभाव अशा अनेक प्रकरणात शिंदे सेना व भाजपमधील वाद समोर आला आहे. त्यात आता महायुतीचे सरकार स्थापन होऊन सहा महिने उलटले तरी शिवसेनेच्या मंत्र्यांना खासगी सचिवांची प्रतीक्षा आहे. खासगी सचिव नियुक्तीची फाइल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात असून अद्याप मुख्यमंत्र्यांनी खासगी सचिव नियुक्तीला हिरवा कंदील दाखवलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासगी सचिव नियुक्तीच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतल्याचे समजते. काही कॅबिनेट मंत्र्यांनी काही विशिष्ट खासगी सचिव असावे, असा आग्रह धरला होता. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यास नकार देत नव्या खासगी सचिव नियुक्त नावाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवसेनेतील कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्यासह उदय सामंत, शंभूराजे देसाई, भरत गोगावले, गुलाबराव पाटील या कॅबिनेट मंत्र्यांनी खादी सचिव नियुक्तीसाठी ही नाव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली होती.

logo
marathi.freepressjournal.in