भंडारा गोंदियात भाजपला धक्का; माजी खासदार शिशुपाल पटले यांचा काँग्रेस प्रवेश

भंडारा गोंदिया जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत शुक्रवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.‌
भंडारा गोंदियात भाजपला धक्का; माजी खासदार शिशुपाल पटले यांचा काँग्रेस प्रवेश
@DabangYogi/X
Published on

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधीच भंडारा गोंदिया जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत शुक्रवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.‌

दादर येथील टिळक भवन येथे शिशुपाल पटले यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. पटले यांच्या काँग्रेस प्रवेशाने भंडारा गोंदिया जिल्ह्यात काँग्रेस अधिक मजबूत होईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, तुमसरचे माजी आमदार अनिल बावनकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

या देशातील आणि राज्यातील जनतेला न्याय देण्याचे आणि राज्याला पुढे घेऊन जाण्याचे काम काँग्रेस पक्षच करू शकतो, त्यामुळेच नाना पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केला, असे पटले म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in