कायदा-सुव्यवस्थेवर भाजपने भूमिका स्पष्ट करावी -आदित्य

भाजपने त्यांची अधिकृत भूमिका या प्रकरणांमध्ये सांगावी, असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिले.
कायदा-सुव्यवस्थेवर भाजपने भूमिका स्पष्ट करावी -आदित्य

मुंबई : कॅबिनेट बैठकीमध्ये कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. सरकारमधील आमदार गणपती मिरवणुकीत पिस्तूल काढतात. पोलीस ठाण्यात गोळीबार करतात. अशा आमदारांना सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष केले जाते, तर यांचे अधिकारी महिलेवर गाडी चालवतात. आमदाराचा मुलगा अपहरण करतो, हे सगळं कॅमेऱ्यामध्ये दिसते. भाजपने त्यांची अधिकृत भूमिका या प्रकरणांमध्ये सांगावी, असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिले.

महालक्ष्मी प्रकल्प बिल्डरांच्या मोफत एफएसआयसाठी असल्याचा आरोप करताना आदित्य ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे बिल्डरसोबत साटेलोटे सुरू होते.तबेले बांधले जाणार आहेत. पण घोडे हे सुटाबुटतील लोकांचे आहेत. ज्यांना तबेले बांधून दिले जाणार आहेत. आत्ता सेंट्रल पार्कचा घाट घातला जातोय. कोणत्या बिल्डरसाठी हे सुरू आहे? सेलिब्रिटींना ट्विट करायला लावलं, पण प्रकल्प उभारताना बाजूच्या कोणत्या एसआरएमध्ये आजूबाजूच्या लोकांना सामावून घेणार? पण मोफत एफएसआय मुंबईकरांच्या पैशातून बिल्डरला देणार आहात. म्हणूनच मोठ्या प्रमाणात या पार्कला विरोध होतोय, असे आदित्य ठाकरे म्हणाले. पण आम्ही बिल्डरांना तिथे कार पार्क प्रकल्प करू देणार नाही. आम्ही मुंबईकरांचा पैसा वाया जाऊ देणार नाही. कारण रेसकोर्सचा वापर हा सामान्य मुंबईकर योगा, मॉर्निंगवॉकसाठी करतात, असं आदित्य ठाकरे म्हणाले.दिघा रेल्वे स्थानक, अटल सेतू प्रकल्प उभारून पूर्ण झाले होते, मात्र उद‌‌्घाटनासाठी सरकारला मुहूर्त नव्हता. कोस्टल रोडचं काम पूर्ण देखील झालं नाही. तरी केवळ निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून उद‌्घाटनाचा घाट घातला जातोय. कोस्टल रोडचं काम आमचं आहे. उद्धव ठाकरे यांचं ते स्वप्न होतं. दर महिन्याला आम्ही भेटी द्यायचो. आमचं सरकार असतं तर सगळी कामं आम्ही वेळेत पूर्ण केली असती, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in