'तुरुंगात राहिल्याने राऊतांना...' नामर्द सरकार या टीकेवर भाजप आक्रमक

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी साधला संजय राऊत यांच्यावर निशाणा
'तुरुंगात राहिल्याने राऊतांना...' नामर्द सरकार या टीकेवर भाजप आक्रमक

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील वाद चिघळत चालला आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका करत महाराष्ट्र सरकारला 'नामर्द सरकार' असे म्हंटले. यावरून आता भाजप आक्रमक झाली असून भाजपच्या नेत्यांनी त्यांवर टीका करत, त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे.

भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "मागील अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार होते. त्यावेळी त्यांनी का मर्दानगी दाखवली नाही? स्वत: आत्मचिंतन करून स्वत:ला उपमा देण्याचे काम तेच करू शकतात." तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "संजय राऊतांनी ही भाषा तुरुंगात राहल्याने इतर कैद्याकडून शिकली असावी. षंढ, नामर्द, आमदारांना रेडा म्हणणे, हा कदाचित इतर कैद्यांबरोबर राहल्याचा प्रभाव असू शकतो." अशी सणसणीत टीका त्यांनी केली. पुढे बावनकुळे म्हणाले की, "मंत्री बेळगावात गेले नाही म्हणून सरकार षंढ आहे, नामर्द आहे म्हणणं ही भाषा संजय राऊतांना शोभत नाही. मर्दानगी आणि सरकार चालवण्याची धमक शिंदे-फडणवीसांमध्ये आहे, हे राऊतांना माहिती आहे. प्रत्येक गोष्टीचे उत्तर हे सामाजिक वातावरण अशांत करून होत नाही

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in