जळगाव रावेरची जागा राखण्यात भाजपला यश, जळगाव स्मिता वाघ, तर रावेरला रक्षा खडसे विजयी

जळगाव रावेरची जागा राखण्यात भाजपला यश, जळगाव स्मिता वाघ, तर रावेरला रक्षा खडसे विजयी

रावेर आणि जळगावची जागा राखण्यात भाजपला यश आले आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार रक्षा खडसे या विजयी होत त्यांनी आपल्या या यशाची हॅटट्रिक पूर्ण केली.

विजय पाठक/जळगाव

रावेर आणि जळगावची जागा राखण्यात भाजपला यश आले आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार रक्षा खडसे या विजयी होत त्यांनी आपल्या या यशाची हॅटट्रिक पूर्ण केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांचा २ लाख ७१ हजारांची आघाडी घेत पराभव केला, तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या स्मिता वाघ यांनी शिवसेना उबाठाचे उमेदवार करण पवार यांचा २ लाख ४७ हजार मतांच्या फरकाने पराभव केला.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापत ते स्मिता वाघ यांना देण्यात आले होते. उन्मेष पाटील हे पक्षीय राजकारणाचा बळी ठरले होते. त्यामुळे त्यांनी भाजपची साथ सोडत शिवसेना उबाठाला जवळ केले. त्यांना तिकीट देऊ केले असता, त्यांनी ते नाकारत करण पवार यांना दिले आणि करण पवार चर्चेत आले. उबाठाच्या नाराज शिवसैनिकांची त्यांना चांगली साथ मिळेल. तसेच महाविकास आघाडी देखील साथ देईल, अशी अपेक्षा असतांना तसे घडले नाही. स्मिता वाघ यांना ६ लाख ६२ हजार ५७९ मते तर करण पवार यांना ४ लाख १५ हजार ४६५ मते मिळालीत.

रावेर मतदारसंघात रक्षा खडसे यांना प्रथम उमेदवारी न देण्याचे प्रयत्न पक्षातून झाले; मात्र थेट दिल्लीतून रक्षा खडसे या आशीर्वादासह तिकीट मिळवण्यात यशस्वी झाल्या. २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी झाल्यानंतर हा वर्षात त्यांनी केंद्राच्या योजना मतदारांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी झाल्या. रक्षा खडसे यांना यांना ६ लाख २७ हजार ६७२, तर श्रीराम पाटील यांना ३ लाख ५६ हजार ६२४ ते मिळालीत. आपल्या या निवडीचे श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व, कार्यकत्यांची मेहनत व राज्यातील पक्षातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन यास दिले.

नंदुरबारची जागा मिळवण्यात काँग्रेस यशस्वी

रक्षा खडसे - ६,२७,६७२

स्मिता वाघ - ६,६२,५७९

नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा, काँग्रेसचा बालेकिल्ला. काँग्रेसने प्रत्येक योजनेचा शुभारंभ हा या जिल्ह्यात केला; मात्र तरीही विकासापासून हा जिल्हा मागेच राहीला. हा वर्षापूर्वी हे हेरत भाजपने जाणीवपूर्वक नंदुरबारची जागा मिळवण्यात यश मिळवले हिना गावीत यांनी नंदुरबारचे प्रतिनिधित्व केले. यावेळी देखील हिना गावीत यांना भाजपने तिकीट देत ही जागा राखण्याचा प्रयत्न केला; मात्र काँग्रेसने गोवाल पाडवी यांना उमेदवारी देत आव्हान दिले. विशेष लक्ष देत हिना गावीतांचा पराभव करत नंदुरबारची प्रतिष्ठेची जागा परत मिळवली. भाजपसाठी हा मोठा धक्का आहे.

logo
marathi.freepressjournal.in