"मराठा-ओबीसींमध्ये वाद लावून भाजपला महाराष्ट्राचं मणिपूर करायचंय", नाना पटोलेंचा गंभीर आरोप

मराठ्यांना आरक्षण द्यायला जातनिहाय गणनेशिवाय पर्याय नाही
"मराठा-ओबीसींमध्ये वाद लावून भाजपला महाराष्ट्राचं मणिपूर करायचंय", नाना पटोलेंचा गंभीर आरोप

जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी अमरण उपोषण सुरु केलं आहे. यानंतर राज्य सरकारने मराठवाड्यातील मरााठा समाजाला कुणबी दाखले देण्याबाबत शासन निर्णय जारी केला. यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याची लेखी विनंती केली. मात्र, सरसकट सर्वांना असा उल्लेख नसल्याने मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला. अशात आता ओबीसी आरक्षणातून मराठा आरक्षण देण्याबाबत तर्क-विर्तक लढवलणं सुरु आहे. यावर कांग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केला आहे.

नाना पटोले म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीत भाजपने मराठा समाजाला आरक्षण देण्याचं वचन दिलं होतं. ते त्यांना पाळता आलेलं नाही. मात्र, आम्ही केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यास आरक्षणाची ५० टक्के मर्यादा वाढवून कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ, असं आश्वासन नाना पटोलेंनी दिलं आहे.

ते पुढे म्हणाले की, भाजपला जातनिहाय गणना करुन मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायचं नाही. ओबीसी समाजाच्या आरक्षणातुन मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाषा करुन ओबीसींना मराठ्यांविरुद्ध भडकवण्याचा भाजपचा प्रकार आहे. मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करुन भाजपला महाराष्ट्राचे मणिपूर करायचं आहे. असा गंभिर आरोप नाना पटोलेंनी केला आहे. यावेळी त्यांनी दोन्ही समाजातील जनतेला संयम बाळगण्याचं आवाहन देखील केलं आहे. यावेळी मराठ्यांना आरक्षण द्यायला जातनिहाय गणनेशिवाय पर्याय नाही. परंतु, भाजप त्याविरोधत असल्याचंही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in