मराठा आंदोलनात भाजपचा फूट पाडण्याचा प्रयत्न - जरांगे

मराठा आंदोलनात फूट पाडण्यासाठी काही कार्यकर्ते भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पाठविले होते, असा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केला आहे.
मराठा आंदोलनात भाजपचा फूट पाडण्याचा प्रयत्न - जरांगे
Published on

मुंबई : मराठा आंदोलनात फूट पाडण्यासाठी काही कार्यकर्ते भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पाठविले होते, असा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केला आहे. मराठा आंदोलनात फूट पाडण्यासाठी मराठा संघटनांमध्ये विभाजन करण्याचा डाव होता. मराठा जातीतील नेत्यांना परस्परविरोधी वक्तव्ये करण्यासाठी दबाव आणला जात होता. त्यामुळे येत्या ७ ऑगस्ट रोजी मराठा समाजाच्या रॅलीत गोंधळ माजविण्याचा डाव दिसून येत असल्याचा आरोपही जरांगे-पाटील यांनी केला.

मातोश्री येथे केलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी निदर्शने केली. या निदर्शनामध्ये भाजपच्या एका मंत्र्याचे जवळचे कार्यकर्ते रमेश केरे पाटील, भाजप नेत्याचे कल्याणमधील कार्यकर्ते सुनील पायल हे असल्याचे सांगण्यात येत आहे. या आंदोलनात आणखी कोण कोण होते? व कोणी त्यांना पाठविले हे शोधून काढू असा इशारा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in