रायगड लोकसभेवर भाजपचा दावा! पेणमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात धैर्यशील पाटील यांच्या नावाची घोषणा !

रायगड लोकसभा मतदार संघातील पेण तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता.
रायगड लोकसभेवर भाजपचा दावा! पेणमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात धैर्यशील पाटील यांच्या नावाची घोषणा !

पेण : रायगड लोकसभा मतदार संघातील पेण तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांकडून रायगड लोकसभेचे उमेदवार भाजपचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार धैर्यशील पाटील असणार असल्याचे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. भाजप हा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे रायगड लोकसभेची जागा भाजपलाच मिळावी, असा दावा पुन्हा एकदा भाजपच्या जिल्हापातळीवरील नेत्यांकडून करण्यात आला आहे. विद्यमान आमदार सुनिल तटकरे यांना निवडूण आणणारे तेव्हाचे ६ आमदार आता त्यांच्यासोबत नाहीत, त्यामुळे मागच्या निवडणुकीतला विजयाचा निकष यावेळी लागवता येणार नाहीत, असे भाजपकडून सांगण्यात येत आहे.

केंद्रात २०१४ मधे रायगड जिल्ह्यातील पनवेल विधानसभा मतदार संघात प्रशांत ठाकूर यांनी कमळ फुलवीले. तर २०१९ मधे पेण विधानसभा मतदारसंघात आमदार रविशेठ पाटील यांनी विजय संपादन केला. आता तर २०२४ मधे सब कुछ भाजपा अशा प्रकारे चार विधानसभा पेण अलिबाग श्रीवर्धन आणि महाड या मतदारसंघात भाजपची ३ लाख ५० हजार मताधिक्य असल्याने आणि मोदी सरकारने राबविलेल्या जनहिताच्या योजनांचा अमंळ भाजपाचे वतीने झाल्याने रायगड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी भाजपच्या कमळ चिन्हावर धैर्यशील पाटील यांना मिळालीच पाहिजे असा निर्धार उपस्थित सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी केला आहे.

यावेळी भाजपचे अतुल काळसेकर, महेश मोहिते, वैकुंठ पाटील, मंगेश दळवी, विक्रांत पाटील आणि इतर प्रमुख पदाधिकारी यांनी मोदी सरकारने राबविलेल्या योजनांबाबत कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले. या कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महामंत्री विक्रांत पाटील, पेण विधानसभा प्रमुख प्रसाद भोईर, माजी जिल्हा परिषद सदस्य कौसल्या पाटील, जिप सदस्य डी.बी.पाटील, प्रभाकर म्हात्रे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, महेश मोहिते, रायगड जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, राजेश मपारा तसेच हजारोंच्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

तटकरे नेते आहेत, त्यांनी एका मतदारसंघात अडकू नये!

राष्ट्रवादीचे नेते तथा रायगडचे खासदार सुनिल तटकरे हे राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि महायुतीमधील एक प्रमुख नेते आहेत, त्यामुळे त्यानी निवडणूक लढवून एकाच मतदारसंघात अडकण्यापेक्षा, जास्तीत जास्त खासदार निवडूण आणण्यासाठी राज्यभर फिरावे असे आवाहन भाजप नेत्यांनी पेणमध्ये केला आहे. त्याचसोबत रायगडमधून धैयशील पाटील यांनाच निवडूण आणण्यासाठी प्रयत्न करावा असा सल्ला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी सुनिल तटकरे यांना दिला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in