
‘आऱसीएफ’ कंपनीच्या थळ येथील प्रकल्पात बुधवारी सायंकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
‘राष्ट्रीय केमिकल्स अँण्ड फर्टिलायझर्स लिमिटेड’ कंपनीच्या थळ येथील प्रकल्पातील स्टीम जनरेशन प्लांटमध्ये नवीन वातानुकूलित यंत्रणा बसविण्याचे काम सुरू होते. ‘ऍरिस्टो ट्रोटल’ नामक कंपनीला ही यंत्रणा बदलण्याचे काम देण्यात आले होते. या कंपनीमार्फत वातानुकूलन यंत्रणा बसवितांना बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मोठा स्फोट झाला. यात सहा कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना आरसीएफ कंपनीच्या कुरूळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता यातील तिघांचा मृत्यू झाला. या स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
या दुर्घटनेत अंकित शर्मा, फैजून जुनेद शेख (३२), दिलशाद आस्लाम इदनिकी (२९) यांचा मृत्यू झाला असून साहिद मोहम्मद सिद्दीकी (२३), जितेंद्र शेळके (३४) व अतिनदर मनोज हे तिघे जखमी झाले आहेत.