फलक लावण्यास विरोध केल्याने भाऊसिंगजी रोडवर रास्ता रोको

संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास करवीर पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको आंदोलन केलं
फलक लावण्यास विरोध केल्याने भाऊसिंगजी रोडवर रास्ता रोको

कोल्हापूर: करवीर तालुक्यातील कुरुकली इथं महापुरुषांचे फलक लावण्यास विरोध झाल्यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास करवीर पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी पणजी अक्कलकोट मार्गावरील एसटी बसवर दगडफेक झाल्याचा प्रकार देखील घडला त्यामुळे रात्री करवीर पोलीस ठाणे परिसरासह कुरुकली इथं तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. कुरुकली इथं महापुरुषांचे फलक लावण्यात येत होते यावेळी गावातील काही व्यक्तींनी डिजिटल फलक लाऊ दिला नाही.. यावेळी झालेल्या वादावादी नंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी करवीर पोलीस स्टेशन गाठले आणि अज्ञातावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली यानंतर अचानकच करवीर पोलीस ठाण्यासमोर रस्त्यावर कार्यकर्त्यांनी ठिय्या मारला यावेळी पणजी अक्कलकोट मार्गावरील जाणाऱ्या एसटीवर काहींनी दगडफेक केल्याचा प्रकार देखील या ठिकाणी घडला. या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानंतर करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी दोन्ही गटांना एकत्र बोलवत या वादावर पडदा टाकला मात्र अचानक सुरू झालेल्या रास्ता रोको मुळे करवीर पोलीस ठाणे परिसरासह कुरुकलीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता..

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in