उन्हाळी सुट्टीत बीएलओची निवडणूक ड्युटी स्वीकारण्याची सक्ती नाही ; उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

विधानसभा निवडणूक अधिकाऱ्यांना तात्काळ फोन व मोबाईल वरून बी. एल. ओ. ड्युटी स्वीकारण्याची कोणाही शिक्षकांवर सक्ती करू नका
उन्हाळी सुट्टीत बीएलओची निवडणूक ड्युटी स्वीकारण्याची सक्ती नाही ; उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकांना लावलेली निवडणूक बीएलओची ड्युटी स्वीकारण्याची कोणतीही सक्ती नाही, अशी स्पष्टोक्ती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाला हक्काची उन्हाळी सुट्टी मिळणारच, असे त्यांनी तत्वतः मान्य करून तसे निर्देश दिले आहेत.

उपनगर जिल्हाअधिकारी कार्यालय वांद्रे पूर्व येथे मंगळवार दुपारी शिवसेना मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे व शिक्षक सेनेचे नेते शिवाजी शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या शिष्टमंडळाने डॉ.राजेंद्र भोसले व उपजिल्हाधिकारी तेजस समेळ यांची भेट घेतली.

उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकांना बीएलओ निवडणूक ड्युटी बजावण्यात आली आहे, ती रद्द करावी आणि उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर १५ जूनपासून ही निवडणूक ड्युटी लावावी, असे निवेदन देण्यात आले.

यासंदर्भात डॉ. राजेंद्र भोसले व उपजिल्हाधिकारी तेजस समय यांनी सदर तोंडी आदेश दिल्याची माहिती आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिली. त्यानुसार सर्व विधानसभा निवडणूक अधिकाऱ्यांना तात्काळ फोन व मोबाईल वरून बी. एल. ओ. ड्युटी स्वीकारण्याची कोणाही शिक्षकांवर सक्ती करू नका, असे तोंडी निर्देश दिल्याची माहिती त्यांनी दिली. काही अडचण आल्यास किंवा कोणीही विधानसभा निवडणूक अधिकारी सक्ती करत असल्यास शिक्षकांनी शिवाजी शेंडगे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in