भोंदू अशोक खरात प्रकरण : खरातला २६ पर्यंत ईडी कोठडी

आध्यात्मिक उपचारांच्या बहाण्याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या अशोक कुमार एकनाथ खरात ऊर्फ 'कॅप्टन' याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबईतून अटक केली आहे.
भोंदू खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; खरातच्या फरार पत्नीचा शोध सुरूच
भोंदू खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; खरातच्या फरार पत्नीचा शोध सुरूच(संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : आध्यात्मिक उपचारांच्या बहाण्याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या अशोक कुमार एकनाथ खरात ऊर्फ 'कॅप्टन' याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबईतून अटक केली आहे. ईडीच्या मुंबई कार्यालयाने मनी लॉन्ड्रिंग आणि कथित खंडणी प्रकरणाच्या चौकशीनंतर ही कारवाई केली.आरोपी खरातला १९ मे रोजी धन शोधन निवारण कायद्यांतर्गत अटक करण्यात आली असून, मुंबईच्या विशेष न्यायालयाने त्याला २६ मे २०२६ पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ही माहिती ईडीने सोमवारी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून दिली आहे.

भोंदू खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; खरातच्या फरार पत्नीचा शोध सुरूच
भोंदू अशोक खरात प्रकरण : खरात ED च्या ताब्यात, चौकशीसाठी मुंबईला

या प्रकरणाच्या शोध मोहिमेमध्ये ईडीच्या हाती मोठे घबाड आणि महत्त्वाची कागदपत्रे लागली आहेत. छाप्यात तब्बल १३.९२ कोटी रुपयांची थेट रोकड आणि ५,५०० अमेरिकन डॉलर्स जप्त करण्यात आले आहेत. सुमारे १.१२ कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून, विविध बँकांमधील २.२५ कोटी रुपयांची रोकड फ्रीज (गोठवण्यात) करण्यात आली आहे. गुन्ह्याच्या पैशातून खरेदी केलेली एक अत्यंत महागडी 'मर्सिडीज बेंज' कार जप्त करण्यात आली असून अनेक बेनामी मालमत्तांचे रेकॉर्ड आणि डिजिटल उपकरणे ईडीने ताब्यात घेतली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in