पेण येथील भोगावती नदी पात्रात आढळली बॉम्ब सदृश्य वस्तु

या घटनेमुळे पेणमध्ये खळबळ माजली आहे. बाँम्ब शोधक पथक घटना स्थळी दाखल झाले आहे.
पेण येथील भोगावती नदी पात्रात आढळली बॉम्ब सदृश्य वस्तु

पेणनजीक असलेल्या भोगावती नदीच्या पुला खालील पात्रात बॉम्ब सदृश्य वस्तु निदर्शनास आली आहे. महत्वाचे म्हणजे हा पुल मुंबई आणि कोकण यांना जोडणारा पुल आहे. गुरुवारी सायंकाळी ५.४८ वाजता सदरील घटना समोर आली आहे. पेण येथील समाज सेवक स्वरूप घोसाळकर आणि त्यांचे सहकारी मितेश पाटील यांना ही बॉम्ब सदृश्य वस्तु नदी पात्रात दिसून आली त्यांनी तात्काळ पेण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक देवेन्द्र पोळ यांना या बाबत माहिती दिली.

या घटनेमुळे पेणमध्ये खळबळ माजली आहे. बाँम्ब शोधक पथक घटना स्थळी दाखल झाले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in