'त्या' तिघांना शिवछत्रपती पुरस्कार का नाही? हायकोर्टाची राज्य सरकारसह क्रीडा विभागावर तीव्र नाराजी

न्यायालयाच्या आदेशानंतरही यावर्षीच्या राज्य क्रीडा पुरस्कारासाठी डावलण्यात आलेल्या तिघा खेळाडूना पुरस्कार का दिला जाऊ नये, अशी विचारणा करत मुंबई हायकोर्टाने...
'त्या' तिघांना शिवछत्रपती पुरस्कार का नाही? हायकोर्टाची राज्य सरकारसह क्रीडा विभागावर तीव्र नाराजी
Published on

मुंबई : न्यायालयाच्या आदेशानंतरही यावर्षीच्या राज्य क्रीडा पुरस्कारासाठी डावलण्यात आलेल्या तिघा खेळाडूना पुरस्कार का दिला जाऊ नये, अशी विचारणा करत मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारसह क्रीडा विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने त्या तिघा खेळाडूंना पुरस्कार द्या, अन्यथा दिलेले पुरस्कार आम्ही रद्द करू, असे तोंडी निर्देशच राज्य सरकारला दिले.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करताना दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेचवर दोन दिवसांपूर्वी खंडपीठाने दोघा खेळाडूंचा क्रीडा पुरस्कारासाठी प्राधान्याने विचार करण्याचे आदेश दिलेले असताना विराज लांडगे (कबड्डी), विराज परदेशी (जिम्नॅस्टिक्स) आणि गणेश नवले या तिघा खेळाडूंच्या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

logo
marathi.freepressjournal.in