ऑर्केस्ट्रा परवान्यांवर आठ आठवड्यांत निर्णय घ्या! हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

ऑर्केस्ट्रा आणि नृत्य सादरीकरणाच्या परवान्यांबाबत स्पष्टता मिळवण्यासाठी ‘नवी मुंबई हॉटेल ओनर्स असोसिएशन’ने सादर केलेल्या निवेदनावर आठ आठवड्यांत अंतिम निर्णय घ्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
ऑर्केस्ट्रा परवान्यांवर आठ आठवड्यांत निर्णय घ्या! हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश
ऑर्केस्ट्रा परवान्यांवर आठ आठवड्यांत निर्णय घ्या! हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मुंबई : ऑर्केस्ट्रा आणि नृत्य सादरीकरणाच्या परवान्यांबाबत स्पष्टता मिळवण्यासाठी ‘नवी मुंबई हॉटेल ओनर्स असोसिएशन’ने सादर केलेल्या निवेदनावर आठ आठवड्यांत अंतिम निर्णय घ्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने असोसिएशनची याचिका निकाली काढताना प्राधिकरणाला निर्देश दिले आहेत.

ऑर्केस्ट्रा परवान्यांवर आठ आठवड्यांत निर्णय घ्या! हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश
टाटा सन्सची सोमवारी बैठक; चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीला कोर्टाची स्थगिती नाही

नवी मुंबई येथील हॉटेल्स व रेस्टॉरंट्सकडे ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत ऑर्केस्ट्रा परवाने असताना त्यांचे परवाने मुदत संपण्यापूर्वीच रद्द केले. याला आव्हान देत हॉटेल ओनर्स असोसिएशनने याचिका दाखल केली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)