मुंबई पोलिसांना धमकीच्या फोनने खळबळ ; मुंबईसह पुणे बॉम्बने उडवून देण्याची दिली धमकी

पोलिसांनी युपी पोलिसांच्या मदतीने धमकीचा फोन करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत
मुंबई पोलिसांना धमकीच्या फोनने खळबळ ; मुंबईसह पुणे बॉम्बने उडवून देण्याची दिली धमकी
Twitter

मुंबई पोलिसांना धमकीचे फोन येणं सुरुच असून एका फोन कॉलने सर्वांची झोप उडवली आहे. एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये फोन करुन महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई आणि सांस्कृतीक राजधानी पुणे ही दोन महत्वाची शहरे बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. तसंच कुर्ला आणि अंधेरी भागात शनिवार २४ जून रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता स्फोट करण्याची देखील धमकी देण्यात आली आहे.

महत्वाचे म्हणजे मुंबई पोलिसांनी युपी पोलिसांच्या मदतीने धमकीचा फोन करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या २५ ते ३० वर्षादरम्यान वय असेल्या आरोपीला मुंबईत आणण्यात आलं असून त्याने फोन का केला, या मागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आरोपीची वेगवेगळी नावं असून नेमकं त्याचं खरं नाव काय याबाबतची माहिती तो पोलिसांना देत नाही.
पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

विशेष म्हणजे या कॉलरने पोलिसांशी बोलताना सांगितलं की. त्याला दोन लाख रुपयांची गरज आहे. त्याची गरज पूर्ण झाल्यास तो बॉम्बस्फोट थांबवू शकतो. तसंच तो पुण्यात देखील बॉम्बस्फोट करणार असून तो स्व:ता हे स्फोट घडवून आणणार आहे. या कामासाठी त्याला दोन कोटी रुपये मिळाले असल्याचं देखील त्याने सांगितलं. त्याला दोन लाख रुपये मिळाल्यास तो आपल्या माणसांसोबत मलेशियाला रवाना होईल, असा दावा या कॉलरने केला आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in