जन्मताच अंधत्व बाळगून तरुणाची बँक अधिकारी पदाला गवसणी

जन्मताच मिळालेलं अंधत्व आणि घरच्या अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थितीवर मात करत रघुनाथ मधुकर खोत यांना बँक अधिकारी पद मिळवलं
जन्मताच अंधत्व बाळगून तरुणाची बँक अधिकारी पदाला गवसणी
Published on

जन्मतःच अंधत्व असतानाही शिकण्याची जिद्द मनाची बाळगून कोल्हापूर जिल्ह्यातील वाघवे गावच्या तरुणांनं आय बी पी एस अंतर्गत घेण्यात आलेल्या बँकिंग परीक्षेत बँक अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. रघुनाथ मधुकर खोत असे या अंध तरुणाचं नाव असून त्याच्या या यशाचं कौतुक पंचक्रोशीतून होतयं. पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वागवे गावात खोत कुटुंबीय राहत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून रघुनाथ खोत यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केलं जन्मताच आलेलं अंधत्व सोबत घेत त्याने डीएडचं शिक्षण देखील पूर्ण केलं तेही पुण्यातून. 2016 पासून रघुनाथ खोत हा आयबीपीएस अंतर्गत बँकिंगच्या परीक्षा देत आहे. आणि अखेर तब्बल सात वर्षांच्या अपयशानंतर रघुनाथन बँक अधिकारी पदाला गवसणी घातली सध्या रघुनाथची निवड युनियन बँकेच्या अधिकारी पदी झाली आहे .

एकीकडे एका परीक्षेत नापास झाल्यावर नैराश्यातून विद्यार्थ्यानी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत मात्र प्रयत्नांसह जिद्द आणि चिकाटी मुळेच हे यश मिळाले असल्याचं रघुनाथ न सांगितलं. जन्मताच मिळालेलं अंधत्व आणि घरच्या अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थितीवर मात करत रघुनाथ मधुकर खोत यांना बँक अधिकारी पद मिळवलं त्याच्या या यशाचं कौतुक संपूर्ण पंचक्रोशीतून होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in