हैदराबाद आणि कोलकाता या दोन्ही संघांना प्ले ऑफ फेरीत प्रवेशाची आशा

हैदराबाद आणि कोलकाता या दोन्ही संघांना प्ले ऑफ फेरीत प्रवेशाची आशा

आयपीएल २०२२ च्या ६१ व्या सामन्यात शनिवारी सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात मुकाबला होणार आहे. हा सामना जिंकल्यास हैदराबाद आणि कोलकाता या दोन्ही संघांना प्ले ऑफ फेरीत प्रवेशाची थोडीशी आशा बाळगता येणार आहे.

केन विलियमसनच्या नेतृत्त्वाखालील सनरायजर्स हैदराबाद आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात पुण्यात होणारा हा सामना तसा दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. हैदराबादने ११ सामन्यांमध्ये १० गुण मिळविले आहेत, तर कोलकाताने १२ सामन्यांत १० गुण मिळविले आहेत.

सलग चार सामने गमावल्यानंतर पुनरागमनासाठी झगडणाऱ्या हैदराबादला प्ले ऑफ फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी कोलकाताविरुध्दच्या सामन्यात गोलंदाजिशी संबंधित समस्यांवर उपाय शोधावे लागतील. लागोपाठ पाच विजय मिळविल्यांनतर सलग जार सामने गमवावे लागल्याने प्ले ऑफ फेरीत प्रवेश करण्याच्या हैदराबादच्या अपेक्षांना धक्का बसला आहे. त्यांना आता उर्वरित सर्वच्या सर्व तिन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.

कोलकाता प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर होण्याच्याच मार्गावर दिसत आहे. त्यांचे केवळ दोन सामने उरले आहेत. त्यात विजय मिळाला, तरी त्यांचे १४ अंक होतील. तेवढ्याने त्यांचे भागणार नाही. कारण राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १२ सामन्यांत १४ गुण मिळवून अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. परंतु हैदराबादप्रमाणेच कोलकात्यालाही मग दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागेल.

प्रतिस्पर्धी संघ

कोलकाता नाइट रायडर्स: श्रेयस अय्यर (कर्णधार), ॲरोन फिंच, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, बाबा इंद्रजीत, नीतीश राणा, प्रथम सिंह, रिंकू सिंह, अशोक शर्मा, रसिख डार, शिवम मावी, टिम साउदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, अमन खान, आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, चमिका करुणारत्ने, मोहम्मद नबी, रमेश कुमार, सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्स, शेल्डन जॅक्सन.

सनरायजर्स हैदराबाद: केन विलियमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, निकोलस पूरन, अब्दुल समद, प्रियम गर्ग, विष्णु विनोद, ग्लेन फिलिप्स, आर. समर्थ, शशांक सिंह, रोमारियो शेफर्ड, मार्को यानसेन, जे. सुचित, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, सीन एबॉट, कार्तिक त्यागी, सौरभ तिवारी, फजलहक फारुकी, उमरान मलिक, टी. नटराजन.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in