सराफा दुकानाचे शटर फोडून पावणेदोन लाखांचा ऐवज पळवला

अनिल पांचाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सराफा दुकानाचे शटर फोडून पावणेदोन लाखांचा ऐवज पळवला

नांदेड : सिडको भागातील एका सराफा दुकानाचे शटर फोडून चोरट्यांनी पावणे दोन लाखांचा ऐवज पळविल्याची घटना घडली. यासंबंधी व्यापारी अनिल बालकिशन पांचाळ यांनी पोलीसात तक्रार दिली. पांचाळ यांचे सिडको भागात विश्वकर्मा ज्वेलर्स आहे. पांचाळ हे ६ रोजी रात्री नेहमी प्रमाणे ज्वेलर्सचे दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान ७ रोजी पहाटे ३ ते साडेतीन वाजताच्या सुमारास चोरट्याने शटरचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून दुकानातील ड्रॉप मधील २२ ग्रॅम सोने व ५०० ग्रॅम चांदी असा एकुण एक लाख ७५ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अनिल पांचाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in