दिवाळीलाच भावाने भावाला ठार मारले

मृत महेश मोरे व आरोपी अविनाश मोरे यांच्यात सतत भांडणे होत होती. महेश कामाचे पैसे घरात देत नसल्याने घरात वादावादी होत होती
दिवाळीलाच भावाने भावाला ठार मारले

सांगली : शिराळा तालुक्यातील कापरी येथे पैशाच्या वादावादीतून लहान भावाने मोठ्या भावाचा लाकडी दांडके डोक्यात घालून खून केल्याची घटना घडली. दिवाळीदिनीच ही घटना घडल्याने ऐन सणासुदीत गावावर शोककळा पसरली आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव महेश राजेंद्र मोरे (वय २७) असून आरोपी अविनाश राजेंद्र मोरे (वय २२) हा फरार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

मृत महेश मोरे व आरोपी अविनाश मोरे यांच्यात सतत भांडणे होत होती. महेश कामाचे पैसे घरात देत नसल्याने घरात वादावादी होत होती. पैसे मागितल्यास महेश घरात भांडणे काढत असे याच कारणावरून घराच्या समोर असणाऱ्या रस्त्यावर दोघांची भांडणे लागली. यावेळी अविनाश याने महेशच्या डोक्यात लाकडी दांडके घातले, यामध्ये महेश गंभीर जखमी झाला. डोक्यात गंभीर मारहाण झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in