समाज कार्यात अग्रेसर असणाऱ्या विलेपार्ले येथील कोकण कट्टा या सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी दिवाळीमध्ये पालघर येथील मोखाडा आदिवासी पाड्यातील आदिवासी महिलांसोबत भाऊबीज साजरी होत असते. मात्र यावर्षी कोकण कट्टाच्या सभासदांनी कोकण कोकणचे प्रवेषद्वार असणाऱ्या पेण तालुक्यातील आदिवासी पाड्यांची निवड केली. यामध्ये निगडावाडी, प्रधानवाडी, दर्गावाडी आणि भेंडीचीवाडी या वाड्यांचा समावेश आहे.
येथील ३४८ आदिवासी महिलांना भाऊबीज भेट म्हणून साडी - चोळी आणि फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच तेथील लहान मुलांना खाऊचे वाटपहि करण्यात आले. या समाज कार्यात पेण येथील ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचाही समावेश होता. यावेळी आपल्या भाऊबीज कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांचे आदिवासी तरुणांनी आणि तरुणींनी स्वतःहून बनविलेले पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. भौतिक सोयी सुविधा पासून वंचित असलेल्या दुर्गम भागातील महिलांसोबत आपुलकीच्या भावनेने साजरी झालेली दिवाळी पाहुन येथील महिला भावुक झाल्या त्यांनी कार्यक्रम प्रसंगी कृतज्ञता व्यक्त केली.
कोकण कट्टा आणि ग्राम संवर्धन या संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने केलेल्या या समाज कार्यात कट्टा चे संस्थापक अध्यक्ष अजित पितळे, ग्रामसंवर्धन संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर, कोकण कट्टाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दादा गावडे, खजिनदार सुजित कदम, दया मांडवकर, विवेक वैध्, सुनिल वनकुंद्रे, मनोज शेलार, बंडू डिके, देवदत्त साने, मनिष माईन, सुरेश लीमये, प्रथमेश पवार,आकांक्षा पितळे, नीता पैंगणकर, ग्राम संवर्धनच्या कार्यकर्ते उदय गावंड, राजू पाटील, मानसी पाटील, स्मिता रसाळ, पंकज म्हात्रे, शैलेश कोंडस्कर, जयेश म्हात्रे, सायली ठाकूर, सचिन पाटील, राजेश रसाळ आणि पत्रकार अरविंद गुरव आदी उपस्थित होते.