ग्रामपंचायत निवडणुकीत बीआरएसची दमदार एन्ट्री; 'या' दहा ग्रामपंचातींवर मिळवला विजय

राज्यातील तब्बल 2 हजार 359 ग्रामपंचायतीचा (Maharashtra Gram Panchayat Election Result) निकाल समोर येत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत बीआरएसची दमदार एन्ट्री; 'या' दहा ग्रामपंचातींवर मिळवला विजय

राज्यातील तब्बल 2 हजार 359 ग्रामपंचायतीचा (Maharashtra Gram Panchayat Election Result) निकाल समोर येत आहे. या निवडणूकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. तर महविकास आघडीला मोठा धक्का बसला आहे. असं असताना महाराष्ट्रातून आपल्या पक्षाचा विस्तार करणाऱ्या 'भारत राष्ट्र समिती'(BRS)या पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. भाजप शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यासह आता बीआरएस ने देखील ग्रामपंचायत निवडणूकीत यश मिळवलं आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K.Chandrashekhar rao) भारत राष्ट्र समिती या पक्षाला महाराष्ट्रातील दहा ग्रामपंचायतीमध्ये वियज मिळाला आहे. भंडाऱ्यात तब्बल नऊ ग्रामपंचायतींवर बीआरएसने आपला झेंडा रोवला आहे. तर बीडमधील रेवती देवकी ग्रामपंचायतीही ताब्यात आली आहे.

भंडाऱ्यातील तब्बल नऊ ग्रामपंचायतीवर बीआरएसचा विजय

भंडाऱ्या जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यापैकी २० जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यात भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसला धोबीपछाड देत ९ ग्रामपंचायतींवर बीआरएसने आपला झेंडा फडकवला आहे. यात भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला एका ग्रामपंचातीवर विजय मिळाला आहे.

तर बीडमध्येही बीआरएसने आपलं खातं उघडलं आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रेवकी ग्रामपंचायतीवर बीआरएसने झेंडा फडकवला आहे. शशिकला भगवान मस्के या रेवकी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in