केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी केंद्र सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. टॅक्स स्लॅबमधील कपात ही सर्वात मोठी घोषणा आहे. केंद्र सरकारने जुनी करप्रणाली बंद केली आहे. दरम्यान, अर्थमंत्र्यांनी सांगितले की, काही वस्तू स्वस्त होतील तर काही वस्तू अधिक महाग होतील. सोने, चांदी आणि प्लॅटिनम महाग होतील. सिगारेटही महाग होतील. कारण सिगारेटवरील कस्टम ड्युटी 16 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. त्यामुळे धूम्रपान करणाऱ्यांना सिगारेटसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात.