सहा हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; प्रत्यक्ष निव्वळ भार ४,२४५.९४ कोटींचा

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी वर्ष २०२४-२५ च्या पुरवणी मागण्या सोमवारी विधानसभेत सादर केल्या.
वित्तमंत्री अजित पवार
वित्तमंत्री अजित पवार संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी वर्ष २०२४-२५ च्या पुरवणी मागण्या सोमवारी विधानसभेत सादर केल्या. सादर केलेल्या ६ हजार ४८६ कोटी २० लाख रुपयांपैकी ९३२.५४ कोटींच्या मागण्या अनिवार्य, ३,४२०.४१ कोटींच्या मागण्या कार्यक्रमांतर्गत आणि २,१३३.२५ कोटी रुपयांच्या रकमा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने सादर करण्यात आल्या आहेत. ६,४८६.२० कोटींच्या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा ४,२४५.९४ कोटी रुपये आहे.

विभागनिहाय प्रस्तावित पुरक मागण्या

ग्राम विकास विभाग ३,००६.२८

उद्योग, ऊर्जा, कामगार १,६८८.७४

नगर विकास विभाग ५९०.२८

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग ३१३.९३

पर्यावरण विभाग २५५.५१

महसूल व वन विभाग ६७.२०

इतर मागास बहुजन कल्याण ६७.१२

सार्वजनिक बांधकाम विभाग ५.३५

(रुपये कोटीत)

अशा आहेत पुरवणी मागण्या व समायोजन

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण) सर्वसाधारण अ.ज. घटकातील लाभार्थ्यांसाठी पुरवणी मागणी - ३७५२.१६

बळीराजा वीज दरसवलत योजना कृषी पंप ग्राहकांना (सर्वसाधारण, अ.जा. व अ.ज. घटक) वीजदर सवलत - २,०००.००

केंद्र सरकारकडून राज्य शासनाला भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजनेंतर्गत रस्ते व पूल प्रकल्पांसाठी देण्यात येणाऱ्या बिनव्याजी कर्जासाठी - १,४५०.००

राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान योजनेच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी केंद्र व राज्य हिस्स्यापोटी - ६३७.४२

मुद्रांक शुल्क अनुदान महानगरपालिका व नगरपालिका - ६००.००

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती - ३७५.००

ग्रामीण आरोग्य अभियान अंमलबजावणी केंद्र हिस्सा - ३३५.५७

ग्रामपंचायतींच्या रस्त्यांवरील पथ दिव्यांच्या विद्युत देयकांची रक्कम, विद्युत देयकांची रक्कम अदा करण्यासाठी - ३००.००

राज्यातील ४ साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून महाराष्ट्र शासनामार्फत खेळत्या भागभांडवल निर्मितीसाठी मार्जिन मनी लोन - २९६.००

पुणे रिंग रोड, जालना - नांदेड द्रुतगती महामार्ग भूसंपादनाकरिता घेतलेल्या कर्जावरील व्याजाच्या परतफेडीसाठी - २४४.००

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान केंद्र हिस्सा - १००.००

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवा निवृत्तीवेतन व सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी - २२१.८९

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास बळीराजा जलसंजीवनी योजना, शासन अंशदान या घटकाखाली विविध प्रकल्पांसाठी - १७५.००

राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत मुळा - मुठा नदी, पुणे - प्रदुषण कमी करण्याचा प्रकल्प - १७१.००

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाहभत्ता योजनेसाठी - १५०.००

यंत्रमाग ग्राहकांना वीजदर सवलत देण्यासाठी अतिरिक्त तरतूद करणेबाबत - १००.००

logo
marathi.freepressjournal.in