जळगावात राऊतांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

संजय राऊत यांनी अत्यंत कडवट शब्दात गुलाबराव पाटील यांच्यावर टिका केली होती
जळगावात राऊतांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे हे पक्षप्रमुख, कुटुंब प्रमुख म्हणून गुवाहाटीला गेलेल्या बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन करत असतांनाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना उद्देशून जे आक्षेपार्ह शब्द वापरले त्याचे पडसाद शिंदे समर्थकात उमटले असून त्यांच्याकडून संताप व्यक्त केला जात असून जिल्ह्यात धरणगाव, पाळधी, सावदा, मुक्ताईनगर बोदवड येथे खासदार संजय राऊत यांच्या पुतळ्याचे जोरदार घोषणाबाजी करत दहन केले.

शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारत गुवाहाटी येथे गेलेल्या आमदारांनी परत येण्यास नकार दिल्याने मविआची सत्ता धोक्यात आली असून यामुळे संतापलेल्या खासदार संजय राऊतांनी या बंडखोर आमदारांबाबत जे आक्षेपार्ह शब्द वापरले यामुळे या आमदारांचे समर्थक संतापले आहेत. त्यांनी निदर्शने, घोषणाबाजी करत संजय राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.

संजय राऊत यांनी अत्यंत कडवट शब्दात गुलाबराव पाटील यांच्यावर टिका केली होती. त्यामुळे त्यांच्या समर्थकात संतापाची लाट उसळली होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव, पाळधी येथे पाटील समर्थकांनी मिरवणुका काढत घोषणा देत संजय राऊत यांचा निषेध करत पुतळा जाळला आणि आपण गुलाबराव पाटील यांच्या सोबत असल्याचे त्यांच्या समर्थकांनी जाहीर केले. चोपडा येथे संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेध केला गेला असून गुलाबराव पाटील यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल राऊतांनी माफी मागावी, अशी मागणी एस बी पाटील यांनी केली आहे.

मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांनी मुक्ताईनगर येथे तसेच बोदवड, सावदा येथे देखील मिरवणुका काढत संजय राऊतांच्या पुतळ्याचे दहन करत आमदारांच्या भूमिकेचे समर्थन केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in