बिहारमध्ये विषारी दारू पिऊन १३ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये विषारी दारू पिऊन
१३ जणांचा मृत्यू
Published on

भागलपूर

बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने बांका, भागलपूर आणि मधेपुरामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

होळीच्या दिवशी मद्य प्राशन केल्याने बांकामध्ये सहा, भागलपूरमध्ये चार आणि मधेपुरा येथे तीन जणांचा मृत्यू झाला. तर एका व्यक्तीची दृष्टीही गेली. याशिवाय, काहींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बिहारमध्ये दारुबंदी आहे. तरीही दारूची विक्री केली जाते. विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाल्याचे भागलपूरच्या साहेबगंज येथील मृतांच्या नातेवाइकांनी सांगितले. विनोद राय, संदीप यादव, नीलेश कुमार, मिथुन कुमार अशी भागलपूरमधील मृतांची नावे आहेत. सर्व मृत हे एकाच गावातील आहेत. विषारी दारू प्यायल्याने अभिषेक कुमारची दृष्टी गेली आहे. त्याच्यावर मायागंज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

logo
marathi.freepressjournal.in