तलाठी पदासाठी डॉक्टर, पीएचडी, एमबीए पदवीधारकांची रीघ

तलाठी पदासाठी डॉक्टर, पीएचडी, एमबीए पदवीधारकांची रीघ

सरकारी अधिसूचनेनुसार ही स्पर्धा परिक्षा दोन - दोन तासांच्या तीन तुकड्यांमध्ये घेतली जाणार आहे

पुणे: राज्यात ४६०० तलाठी जागा रिक्त असून त्यासाठी इंजिनिअर, पीएचडीधारक, एमबीए पदवीधारकांसह दहा लाखांपेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज केले असल्याची माहिती सरकारच्या भूअभिलेख विभागाकडून मिळाली आहे.

तलाठी हा राज्याच्या महसूल विभागातील क गटातील अधिकारी गावामधील कृषी उत्पादनाच्या संबंधित माहितीची नोंद ठेवण्याचे काम करतो. जमिनी संबंधित सर्व तपशील, पिकांची लागवड, पीक उत्पादन आदी सर्व माहिती नमूद करण्याचे काम तलाठी करीत असतो. त्याच्याकडील आकडेवारीवरुनच देशातील कृषी विभागाची सर्व आकडेवारी तयार होत असते. तलाठी क गटातील अधिकारी असतो ज्याला मासिक रु. २५५०० ते रु. ८११०० रुपये वेतन मिळते. यामुळे या पदासाठी राज्यातील उच्चशिक्षित उमेदवारांनी गर्दी केली आहे. राज्य परिक्षा विभागाचे समन्वयक आणि भू अभिलेख अतिरिक्त संचालक आनंद रायते यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ४६०० रिक्त तलाठी पदासाठी १०.५३ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या पदासाठी १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान संपूर्ण राज्यभरात जिल्हा केंद्रांमध्ये स्पर्धा परिक्षा होणार आहे. या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता पदवी ठेवली असली तरी एमबीए, पीएचडी, बीएएमएस, बीएचएमएस आणि इंजिनिअरींग असे उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सरकारी अधिसूचनेनुसार ही स्पर्धा परिक्षा दोन - दोन तासांच्या तीन तुकड्यांमध्ये घेतली जाणार आहे. त्यासाठी ९ ते ११, १२.३० ते २.३० व ४.३० ते ६.३० अशा वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in