कुत्र्याला वाचवण्याच्या नादात कारची बसला धडक; पाच जण जागीच ठार

तुळजापूरला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला असून कुत्र्याला वाचवण्याच्या नादात कारने बसला धडक
कुत्र्याला वाचवण्याच्या नादात कारची बसला धडक; पाच जण जागीच ठार

तुळजापूरला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला असून कुत्र्याला वाचवण्याच्या नादात कारने बसला धडक दिली. या अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. लातूर-उदगीर रस्त्यावर हैबतपूर पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

उदगीर येथे एका शासकीय रुग्णालयात काम करणारे कर्मचारी कारमधून तुळजापुरला दर्शनासाठी निघाले होते. लातूर-उदगीर मार्गावर हैबतपुरजवळील पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर कुत्र्यांना वाचवताना चालकाने कार वळवली आणि त्याचवेळी समोरून येणाऱ्या एसटी बसवर जाऊन धडकली. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला. अपघातग्रस्त बस ही उदगीरहून चाकूरला जात होती. हा अपघात भीषण असल्यामुळे बसचे समोरील चाक निखळून बाहेर आले. या अपघातात अलोक तानाजी खेडकर, कोमल व्यंकट कोदरे, अमोल जीवनराव देवकते, यशोमती देशमुख आणि चालक नागेश ज्ञानेश्वर गुंडेकर यांचा मृत्यू झाला. तर प्रियांका गजानन बनसोडे गंभीर जखमी आहे. सर्व मृतदेह उदगीर येथील रुग्णालयात नेण्यात आले आहेत. अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कारमधील भाविक तुळजापूरच्या तुळजाभवानीचे दर्शन घेऊन माघारी परतत होते तर बस चाकूरकडे जात होती. अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, जखमींना रुग्णालयात हलवले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in