खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल; 'हा' आहे आरोप

गेले काही दिवस एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे औरंगाबाद नामांतरणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करत आहेत
खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल; 'हा' आहे आरोप

गेल्या काही दिवसांपासून नामांतरणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी गुरुवारी त्यांनी पोलिसांनी परवानगी नाकारली असताना शहरामध्ये कँडल मार्च काढला होता. यामुळे त्यांच्यावर सिटी चौक पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर केल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे आक्रमक झाले. यानंतर त्यांनी आंदोलन सुरु केले. मात्र, हे आंदोलन अनेक कारणांमुळे चर्चेत आले. या आंदोलनादरम्यान काही लोकांनी औरंगजेबाचे फोटो झळकावले होते. यावेळी मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर, 'माझा या घटनेशी काहीही संबंध नसल्याचे मत जलील यांनी केले होते. दरम्यान, ९ मार्चला त्यांनी शहरामध्ये कँडल मार्च काढला. मात्र, याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तसेच, असा कोणताही मोर्चा काढू नये, अशी नोटीसही देण्यात आली. या प्रकरणी खासदार जलील यांच्यासह १५०० लोकांवर जमावबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in