सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या मोसिन मुजावरविरोधात गुन्हा दाखल!

देशाविरुद्ध विधान करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने पेणमधील सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी याचा निषेध केला.
सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या मोसिन मुजावरविरोधात गुन्हा दाखल!
Published on

पेण : पेणमधील मुस्लिम समाजाचा मुलगा मोसिन मुजावरने इन्स्टाग्राम ॲपवरील आयडीवरून दोन समाजात तेढ निर्माण होतील, अशी पोस्ट केली होती. त्यात "इंडिया के रुल्स की तहेस नहेश हो गई है, संभलके रहो हमारे पास तो तलवारे, बॉम्ब, मिसाईल सब रेडी है, देख रहा है ना इराण सब लेके बैठा है जो भी मुस्लिम को तकलीफ देगा एक मिनिट मे उडा देगा वो, एक दिन इंडिया भी हमारा होगा, पूरा कब्जा हमारा होगा, और हम मस्त दबा के मारेंगे" असे देशाविरुद्ध विधान करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने पेणमधील सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी याचा निषेध केला.

पेण नगरपालिका व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर पाकिस्तान विरोधात घोषणा देऊन, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम अशा घोषणा देत निषेध रॅली काढली. पेण पोलिसांनी याची दखल घेत मोसिन मुजावरवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in