जातनिहाय जनगणनेमुळे सामाजिक न्याय मिळेल;अशोक चव्हाण यांचे मत

सध्याची व्यवस्था राज्यात एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न करत आहे
जातनिहाय जनगणनेमुळे सामाजिक न्याय मिळेल;अशोक चव्हाण यांचे मत
Published on

मुंबई : संपूर्ण देशात काँग्रेसला जातनिहाय जनगणना हवी आहे. त्यामुळे चांगला सामाजिक न्याय मिळू शकेल. मात्र, भाजप या प्रकारच्या जनगणनेला विरोध करीत असल्याचे मत काँग्रेसच्या १३९ व्या स्थापना दिनानिमित्त नागपूर येथे पक्ष मेळाव्यात बोलताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.

आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा हटवली जावी, असे काँग्रेसचेही मत आहे. संपूर्ण अभ्यास (जाती-आधारित जनगणना) सर्व राज्यांमधील आरक्षणाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यास मदत करेल, परंतु भाजप या निर्णयाला विरोध करत आहे. यामुळे भाजप अशा प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न करीत आहे, असा दावाही चव्हाण यांनी केला. भाजपला लक्ष्य करताना ते पुढे म्हणाले की, काही ‘नॉन इश्यू’चे ‘इश्यू’मध्ये रूपांतर केले जात आहे.

सध्याची व्यवस्था राज्यात एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा विरुद्ध ओबीसी, दलित विरुद्ध इतर, अनुसूचित जातींविरुद्ध एसटी समुदाय, असे ते म्हणाले. राज्यातील खऱ्‍या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा हा उत्तम मार्ग आहे. असे सांगत त्यांनी केंद्रात भाजपच्या राजवटीत गेली दहा वर्षे वाया गेली असल्याचे लोकांना कळले आहे, असाही दावा केला.

logo
marathi.freepressjournal.in