एमआयटी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा

भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या योगा जगभरात आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून सर्वच ठिकाणी साजरा केला जात आहे
एमआयटी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा
Published on

भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या योगा जगभरात आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून सर्वच ठिकाणी साजरा केला जात आहे.

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग लोणी काळभोर, केंद्रीय आयुष मंत्रालय, सुर्या फाऊंडेशन, लोणी काळभोर आणि कदमवाक वस्ती ग्रामपंचायत मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान आंतरराष्ट्रीय नेचोथेरीपी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जगातील सर्वात मोठ्या संत ज्ञानेश्वर विश्वशांती घुमट येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी १५०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी योग अभ्यास केला. प्रा. विक्रम तोमर, पंतजलीचे संजय भामे यांनी योग अभ्यास प्रशिक्षण दिले. यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटी मिटकॉमच्या संचालिका डॉ. सुनीता मंगेश कराड, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, डॉ. अतुल पाटील, डॉ. रामचंद्र पुजेरी, प्रा. पद्माकर फड, वनिता काळभोर, डॉ. रमाकांत कपले, डॉ. ज्ञानदेव निलवर्ण, लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर, शिवशरण माळी, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in