नागपूर : महा मेट्रो नागपूरचे २०२५च्या अखेरीस ८ किमी लांबीच्या मार्गावर प्रवासी सेवा कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे, असे एमडी श्रावण हर्डीकर यांनी बुधवारी येथे सांगितले. ते मेट्रो भवन येथे आयोजित १० व्या स्थापना दिन समारंभात महा मेट्रो नागपूरच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करत होते. महा मेट्रोचे संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) अनिल कोकाटे, संचालक (वित्त) हरिंदर पांडे, संचालक (प्रकल्प) राजीव त्यागी उपस्थित होते.
नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाले असून ८ किमीचा मार्ग कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महा मेट्रोच्या प्रवासी संख्येत काही कालावधीत वाढ झाली आहे आणि ती दररोज ८० हजारांपर्यंत पोहोचली आहे. या वाढत्या प्रवाशांच्या संख्येची पूर्तता करण्यासाठी नागपूर मेट्रो प्रयत्न करत आहे, असे हर्डीकर म्हणाले.